लातुरच्या अशोक हॉटेल अर्थात लोकमान्य टिळक चौकातील सिग्नल यंत्रणा १५ दिवसांपासून बंद आहे. गुत्तेदाराने या यंत्रणेचे किट काढून नेल्याने हा प्रकार घडला. या चौकात मध्यभागी सकाळी ११ च्या सुमारास एक ट्राफीक हवालदार उभा होता. मन लावून मोबाईलवर काहीतरी पहात होता. पोलिसाचं लक्ष नसल्यानं वाहनं मोकाटपणे हवी तशी जात येत होती!
Comments