काल लातुरच्या मिनी मार्केट सिग्नलजवळ एक वानर आले. लाल सिग्नल पडताच गांधी चौकाकडून आलेली वाहने थांबली. वानरही रांगेतच बसून राहिले. हिरवा सिग्नल पडताच वाहने अशोक हॉटेलकडे निघाली. वानरही वाहनासोबतच धावत निघाले. पुढे कुठे गायब झाले कळाले नाही. हे वानर दोन महिन्यांपासून लातूर शहरातील गल्लोगल्ली भटकत आहे. हजारो लातुरकरांनी त्याला पाहिले आहे. याचा वावर पाण्याची टाकी राजस्थान शाळा, मिनी मार्केट, सावेवाडी, दिवाणजी मंगल कार्यालयाचा परिसर या भागात अधिक असतो.
Comments