लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उत्तम वॉकिंग ट्रॅक तयार झालाय. ४०० मीटर इतका भरणारा हा ट्रॅक या भागातील लोकांनी मॉर्निंग वॉकसाठी उपयोगात आणला. त्यावर मागच्या निवासी जिल्हाधिकार्यांनी आक्षेप घेतला होता. काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूपही घालण्यात आले होते. पण या भागातील नागरिकांनी तत्कालीन जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना अडचण आणि गरज समजाऊन सांगितली तेव्हा परवानगी मिळाली. आता या ट्रॅकचा उपयोग दररोज ३०० ते चारशेजण उपयोग करतात. या मॉर्निंग वॉकर्ससाठी ऊसाचा रस काढून देणारे रिक्षा रोज उभे असतात. सकाळी फिरुन झालं की ही मंडळी रस घेऊन घराकडे रवाना होतात.
Comments