लातुरचा कचरा २० वर्षांपासून वरवंटी शिवारातील डेपोवर जमा केला जातो. आधीचा आणि आताच्या कचर्याचे डोंगरच डोंगर तयार झाले आहेत. या डेपोवर १० ते १२ लाख टन कचरा पडून आहे. या कचर्याचे वर्गीकरण करुन त्यापासून प्लास्टीक वेगळे केले जाते. दोन यंत्रांद्वारे खत तयार केला जातो. या भागात कचर्याचे ८० ते ९० फुटांचे डोंगर आहेत. इथला कचरा बाहेर जाऊ नये म्हणून १० फुटांची संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे! दररोज जुन्या कचर्यातला १०० टन आणि रोज येणार्या १५० टन कचर्यावर प्रक्रिया केली जाते.
Comments