लातुरच्या ठाकरे चौकात महानगरपालिकेची चार क्रमांकाची शाळा आहे. शाळेच्या प्रांगणात सकाळी शाळा सुरु होण्यापूर्वी काहीजणांना एक मृतदेह झाडाला लटकलेला दिसला. याची चर्चा होताच आजुबाजुचे लोक जमले. शेजारी राहणारे कडणे कुटुंबातील सदस्यही आले. ३४ वर्षे वयाचे मृत शिवाजी जाधव खरोसाचे रहिवासी आहेत. ते कडणे कुटुंबाचे निकटवर्तीय असल्याचेही समजले. सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांनी त्यांचा मृतदेह सरकारी दवाखान्याकडे नेला.
Comments