लातूर शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत शहरातील सर्व चौक आणि रस्त्यातील दुभाजक सजवले जात आहेत. चौकांच्या सौंदर्यीकरणासोबतच डिव्हायडर रंगवले जात जात आहेत. झाडे लावली जात आहेत. पाच नंबर चौक ते एक नंबर चौक दरम्यान दुभाजकातील झाडांना पाणी देण्यासाठी पाईप सोडले आहेत. त्या पाईपातले पाणी सरळ रस्त्यावर येत आहे. रस्ता तर भिजतोच आहे पण येणारे जाणारेही भिजत आहेत.
Comments