स्वच्छता निरीक्षणात १५ तारखेला निलंग्याचा नंबर आहे. त्यानंतर लातुरची बारी आहे. स्वच्छता निरीक्षणासाठी लातूर महानगापालिकेने भरपूर जनजागृती केली. नगरसेवकांना कामाला लावलं. जमेल त्या ठिकाणी रंगरंगोटी केली. तात्पुरती शौचालये उभी केली. रस्ते दुभाजक रंगवले, त्यात झाडे लावली. पण अनेक ठिकाणी मनपा काहीच करु शकली नाही. हे छायाचित्र आहे शाहू चौकातील. इथल्या दुभाजकाचे लोखंडी कठडे केव्हाच गायब झाले आहेत. या दुभाजकात मोकाट जनावरे आराम करीत असतात. स्वच्छता निरीक्षणासोबत छायाचित्रांची स्पर्धा ठेवल्यास आमचे प्रतिनिधी अमोल इंगळे यांना या छायाचित्राबद्दल नक्कीच पुरस्कार मिळाला असता!
Comments