आज शिवजयंती. आजवरच्या शिव जयंतीपेक्षा यंदाच्या जयंतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. सबंध शहर भगवं झालेलं दिसत आहे. जागोजागी भगव्या कमानी उभारण्यात आल्या आहेत. ठिकठिकाणाहून उत्स्फूर्तपणे छोट्या मोठ्या मिरवणुका निघत आहेत. अनेक ढोल ताशा मंडळांनी सकाळीच रंगीत तालमीही आटोपल्या. जवळपास प्रत्येकच चौकात स्वागताचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गणेशोत्सवापेक्षाही या स्टॉल्सची संख्या अधिक आहे. (छायाचित्रात गांधी चौकातला स्टॉल)
Comments