एखादी गाडी दिसली मग ती मंत्र्याची की असेना, एखादा खांब, एखादी मोटारसायकल असं काहीही दिसलं की कुत्रा टांग वर करतो. लातूर महानगरपालिकेनं अशीच कुत्रा आणि माणसाची तुलना केली आहे. कुत्रा जितक्या ठिकाणी टांग वर करतो. निश्चितच माणूस तितक्या ठिकाणी सू करीत नाही. मुळातच लातुरात स्वच्छतागृहांची कमी आहे मग ‘अडलेला’ माणूस काय करणार? स्वच्छतागृहांचा पत्ता नाही आणि लातुरच्या नागरिकांवर भिंतीवर चित्रे काढून बदनामी करायची. आपण याच गावातले आहोत, एकवेळ सहन करु पण हे चित्र पाहणार्या बाहेरगावच्या माणसाचा काय समज होणार?
Comments