HOME   लातूर न्यूज

लातूर मनपाने केल्या १०० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त

सोमवार, मंगळवारी विशेष मोहीम, १७ ट्रक्टर व १७ घंटागाडीची व्यवस्था


लातूर मनपाने केल्या १०० किलो प्लास्टीक पिशव्या जप्त

लातूर: महाराष्‍ट्र प्‍लास्‍टीक व थर्माकॉल अविघटनशील वस्‍तुंचे ( उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक ) अधिसुचना, २०१८ द्वारे २३ मार्च २०१८ पासून प्‍लास्‍टीक व थर्माकॉल अविघटनशील इत्‍यादीपासून बनविलेल्‍या वस्‍तूंचे उत्‍पादन, वितरण, वापर, हाताळणी, घाऊक व किरकोळ विक्री, आयात, वाहतूक, साठवणूक यावर महाराष्‍ट्र शासनाने बंदी घातली आहे. त्या अंतर्गत लातूर शहर महानगरपालीकेच्या वतीने शहरात प्लास्टिक बंदी मोहिमे अंतर्गत गंजगोलाई परिसरातील व्यापार्‍यांवर कारवाई करून १०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई स्वच्छता निरीक्षक श्रीकांत शिंदे, प्रदीप गायकवाड, अहमद शेख, हिरालाल कांबळे व त्यांच्या सोबत असलेल्या पथकांनी केली.
या संदर्भात कारवाई अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी उपायुक्त हर्षल गायकवाड यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेतली, व याबाबतीत विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी विशेष मोहीम राबून प्लास्टिक मुक्त शहर व्हावे या करिता घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्‍यापारी, वितरक व वापरकर्ते (वैयक्‍तीक व्‍यक्ति) यांनी आपल्‍याकडील उपलब्‍ध प्‍लास्‍टीक व थर्माकोल साठा शास्‍त्रीय विल्‍हेवाटीसाठी किंवा पुनर्चक्रणासाठी महानगरपालिकेच्‍या संकलन केंद्राकडे किंवा आपल्‍या घरी येणार्‍या घंटागाडीकडे हस्‍तांतरीत करावा. याकरिता विशेष १७ ट्रक्टर व १७ घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे, व्यापारी व नागरिकांनी स्वेच्छेने स्वत:हून आपल्या जवळील प्लास्टिक घंटा गाडीत जमा करून मनपास सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top