लातुरच्या औसा मार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या भागात खड्डे बुजवण्याचे काम १५ दिवसांपूर्वी सुरु झाले पण पाच पन्नास खड्ड्यांशिवाय उरलेल्या खड्ड्यांच्या अंगाला डांबर आणि खडी लागलीच नाही. अनेक ख्ड्ड्यात नुसती कच टाकण्यात आली आहे. डांबराचा पत्ताच नाही. उड्डाण पूल ते नंदी स्टॉप या भागात डाव्या बाजुच्या रस्त्यावर काही खड्डे बुजले आहेत, काही तसेच उघडे आहेत. नंदी स्टॉपपासून आयसीआयसीआय बॅंकेपर्यंत खड्ड्यात नुसती कच भरण्यात आली आहे. त्यापुढच्या भागातील ख्ड्ड्यांना अजून मुहूर्त लागायचा आहे. क्रीडा संकुलाला लागून असलेल्या रस्त्याचा काहीतरी भाग बुजवून झाला पण पलीकडची बाजू अजून अस्पृश्यच आहे. या बाजूला, रस्त्याच्या कडेला खडी आणि कचचे मात्र ढिगारे लागलेले दिसतात. उड्डाण पुलावरचे मात्र सगळे खड्डे बुजले आहेत. एकही खड्डा उघडा दिसत नाही. खड्डे बुजवण्याचे काम झोननिहाय त्या त्या भागातील अभियंते करीत आहेत. या अभियंत्यांना यापेक्षा महत्वाची कामे लागलेली असावीत असं लोक बोलतात.
Comments