लातूर: समाजात स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी स्त्रीमुक्ती आंदोलनात सर्वस्व वाहून घेणारे पहिले दांम्पत्य म्हणजे महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआई फुले. स्त्री शिक्षणाच्या अग्रदूत, स्त्री स्वातंत्र्यांच्या प्रणेत्या, राष्ट्रमाता, प्रथम शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री उद्धारक क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त मयुरी कांबळे, अनुजा कांबळे, पुजा सरवदे, निकीता जाधव, सुनीता मगर, जयश्री शेंडगे, राधाबाई रसाळ व राणीमा शेख यांनी फुले प्रेमींच्या शुभहस्ते क्रांतीजोती सावित्रीआई फुले यांच्या तेलचित्रास पुष्पहार अर्पण करून क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, मेन रोड लातूर येथे महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
लातूर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंहजी घोणे यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या अभिवादन कार्यक्रमासाठी महात्मा फुले ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे (माळी ), मनोज भोसले, शाम गोरे, शिवलिंगजी गुजर व विजय बारबोले सह फुलेप्रेमीं उपस्थितीत होते. यावेळी बोलताना महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता माळी (चांबारगे) यांनी क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या शेजारीच सावित्रीआई फुले यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा म्हणजे फुले दांम्पत्य लातूर शहराचे वैभव वाढवतील असे प्रतिपादन केले. यावेळीं जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नृसिंहजी घोणे यांनीही फुलेदांम्पत्याच्या जीवनावर प्रकाश टाकला. उपस्थित सावित्रीच्या लेकींना व फुलेप्रेमींना रघुनाथ श्रीरंग ढोक लिखित ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुस्तक भेट देऊन फुले दाम्पत्य यांनी केलेले कार्य जनसामान्य पर्यंत पोहोचावे असे आवाहन केले.
Comments