HOME   लातूर न्यूज

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे अभूतपूर्व स्वागत

रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी, विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी


वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे अभूतपूर्व स्वागत

लातूर: महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर राज्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, तथा लातूर जिल्हयाचे पालकमंत्री अमित देशमुख यांचे आज सकाळी ०६.३० वाजता लातूर येथील रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी काँग्रेस पक्षासह विविध पक्षाचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरासह, कार्यकर्त्यांनी त्यांचे अभूतपूर्व स्वागत करून फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून त्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केले. मंत्रीमंडळात सहभागी झाल्यानंतर पहिल्या आगमनप्रसंगी लातूरकरांनी आनंद व्यक्त केला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अमित देशमुख पहिल्यांदाच लातूरात आले. रेल्वेस्थानकावर लातूरकरांचे स्वागत स्विकारल्यानंतर ते बाभळगाव निवासस्थानाकडे रवाना झाले. तेथे बाभळगाव ग्रामस्थांनी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत केले. यानंतर बाभळगाव निवासस्थानी आई वैशालीताई विलासराव देशमुख यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्रयबंक भिसे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, महापौर विक्रांत गोजमगुंडे, अभय साळुंके, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोईज शेख, धनंजय देशमुख, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, एसआर देशमुख, अशोक गोविंदपूरकर, जयसिंह देशमुख, समद पटेल, लक्ष्मण मोरे, संतोष देशमुख, फारूख शेख, सुपर्ण जगताप, दीपक सूळ, प्रवीण सूर्यवंशी, महेश काळे, पृथ्वीराज शिरसाट, मनोज पाटील, चंद्रशेखर दंडीमे, आनंद वैरागे, संभाजी सूळ, विजय देशमुख, श्रीशैल्य उटगे, संजय ओहोळ, व्यंकटेश पुरी, सुधीर अनवले, राजकुमार जाधव, सचिन बडडापल्ले, रविशंकर जाधव, सतीश कुटवाडे, अविनाश देशमुख, मुक्ताराम पिटले, श्याम देशमुख, सत्यजित देशमुख, नामदेव उपाडे यांच्यासह काँग्रेस पक्षसह विविध पक्षाचे, संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक, सदस्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top