HOME   लातूर न्यूज

लातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा

आरक्षणही झाले सुरु, लातूर भाजपाने दिले पालकमंत्र्यांना श्रेय


लातूर-बेंगलोर रेल्वे ०४ तारखेपासून, आठवड्यातून तीनदा

लातूर: लातूर बेंगलोर-यशवंतपूर ही र्लेवेसेवा येत्या चार फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ही गाडी आठवड्यातून तीनदा धावणार आहे. या गाडीचे आरक्षणही सुरु झाले आहे. या गाडीची खूप दिवसांपासून मागणी होती. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, त्याला यश आले असे भाजपच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. असाच पाठपुरावा लातूर-मुंबई पूर्ववत करण्यासाठी पालकमंत्र्यांनी करावा अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त केली जात आहे.
मनपा निवडणुकीच्या दरम्यान लातूरला नवीन रेल्वे सुरु करण्यात येतील असा विश्‍वास भाजपा नेत्यांनी लातुरकरांना दिलेला होता. या विश्‍वासाला तडा जाऊ नये याकरिता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेवून लातूरला नवीन रेल्वे सुरु करुन बेंगलोर-लातूर या रेल्वेचा यामध्ये समावेश असावा अशी विशेष विनंती केली होती. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी त्यास तत्वतः मान्यताही दिली होती. मात्र मधल्या काळात रेल्वेमंत्रालयाचा पदभार सुरेश प्रभू यांच्याकडून पियुष गोयल यांच्याकडे देण्यात आलेला होता. त्यामुळे पुन्हा एकदा या रेल्वेच्या मागणीची आठवण पालकमंत्री निलंगेकर यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना करुन दिली होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आता आठवडयातून तीन दिवस लातूर-बेंगलोर ही रेल्वे ०४ फेब्रुवारीपासून लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहे. रेल्वे क्रमांक १६५८४ ही लातूर-यशवंतपूर (बेंगलोर) गाडी गुरुवार, शनिवार आणि रविवार दुपारी ०३ वाजता लातूर रेल्वे स्थानकावरुन बेंगलोरकडे रवाना होणार आहे. ही रेल्वे दुसर्‍या दिवशी म्हणजेच शुक्रवार, रविवार आणि सोमवार या दिवशी सकाळी ७.४० वाजता बेंगलोर स्थानकावर पोहचणार आहे. रेल्वे क्रमांक १६५८३ ही गाडी बुधवार शुक्रवार आणि शनिवारी सायंकाळी ०७ वाजता बेंगलोर स्थानकावरुन लातूरकडे प्रवासासाठी निघणार आहे.
ही रेल्वे लातूरकरांच्या सेवेत रुजू होत असल्याने लातूरकरांना दक्षिण भारताकडे जाण्याची विशेष सोय होणार आहे. ही रेल्वे सुरु झाल्याने मनपा निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केल्याबद्दल पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विशेष आभार मानले


Comments

Top