HOME   लातूर न्यूज

लातूरातील पर्यटन विकासासाठी २.८० कोटींचा निधी

माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून यश


लातूरातील पर्यटन विकासासाठी २.८० कोटींचा निधी

लातूर: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव, माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रयत्नातून लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटन विकासांच्या कामांना २ कोटी ८० लाख रूपयांचा निधी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ०६ फेब्रुवारी रोजीच्या आदेशानुसार वितरीत केला असून हा निधी येत्या ३१ मार्चपूर्वी खर्च करावयाचा आहे. आमदार अमित देशमुख यांच्याकडे पर्यटन विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार असताना त्यांच्या पुढाकाराने पर्यटन विकासाची कामे मंजूर झाली होती यापैकी लातूर येथील सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थानच्या इमारत बांधकामासाठी ९० लाख रूपये, याच देवस्थानसाठी यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या कामांसाठी ५० लाख रूपये, लातूर शहरातील नाना-नानी पार्क येथील विकास कामांसाठी ५० लाख रूपये, ऐतिहासिक सुरत शाहवली दर्गा येथील कामांसाठी ४० लाख रूपये तसेच पानगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवण्यात आलेल्या चैत्य परिसराच्या विकासासाठी ५० लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पर्यटन विकासाच्या कामात लातूर शहराचे ग्रामदैवत आसणाऱ्या सिद्धेश्वर रत्नेश्वर देवस्थान विकास, याच शहरातील सर्व धर्मीयांचे श्रध्दास्थान आसणाऱ्या सुरत शाहवली दर्गा परिसरात विविध विकास कामे तसेच पानगांव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन करणारे आणि महाराष्ट्राप्रमाणेच शेजारील कर्नाटक व आंध्र प्रदेशातील आंबेडकरांच्या अनुयायांचे श्रध्दास्थान आसणाने पानगांव येथील चैत्य परिसर विकास ही कामे विकसित होत आहेत. लातूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटन विकासांच्या कामांना राज्यांचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.


Comments

Top