HOME   लातूर न्यूज

खासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत


खासदार गायकवाड यांच्यामुळे मिळाली ७० रुग्णांना ०१ कोटीची मदत

लातूर: मतदारसंघातील विविध आजारांनी पीडित सामान्य कुटुंबातील सुमारे ७० रुग्णांना ९८ लाख ५६ हजार ४१२ रुपयांची आर्थिक मदत खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान सहायता योजनेतून मिळवून दिल्याने अनेक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. डॉ. गायकवाड यांनी मिळवून दिलेल्या मदतीमुळे अनेक कुटुंबे उध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. कॅन्सर, हृदयरोग यासह अनेक आजारांच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान सहायता निधीतून रुग्णांना मदत करण्यात येते. पीडित रुग्णाच्या कागदपत्रांसह खासदारांचे एक पत्र जोडून सदर ङ्गाईल पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात येते. त्या फाईलवरील रुग्णालयाने दिलेल्या खर्चाचा तपशील पाहून सदर रुग्णालयाच्या नावाने पंतप्रधान कार्यालय रुग्णाच्या मदतीचा धनादेश काढते. अशा लातूर लोकसभा मतदारसंघातील सुमारे ७० रुग्णांना पंतप्रधान कार्यालयाकडून ९८ लाख ५६ हजार ४१२ रुपयांचा सहायता निधी मिळाला आहे. खासदारांच्या पत्रावर मिळालेल्या पंतप्रधानांच्या निधीमुळे अनेकांचे उजाड होवू पाहणारे संसार नव्याने फुलले आहेत. डॉ. सुनील गायकवाड यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून निधी मिळण्यासाठी तर प्रयत्न केले आहेतच. परंतु, मुख्यमंत्रभ सहायता निधीतून रुग्णाला आर्थिक साह्य होण्यासाठीही शेकडो पत्र दिली आहेत. त्यातील बहुतेक रुग्णांना त्यांच्या पुढील उपचारासाठी मदत मिळाली आहे. त्याचप्रमाणे खाजगी मदत करणार्‍या शिर्डी साईबाबा संस्थान, सिध्दी विनायक संस्थान अशा विविध संस्थानांनाही गायकवाड यांनी पत्र देवून रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. यामुळे अनेकांच्या जीवनात हसू फुलविण्याचे काम त्यांनी केले असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


Comments

Top