HOME   लातूर न्यूज

इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ

जलयोद्ध्याचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न


इंद्रप्रस्थ जलभूमी अभियानाच्या स्वावलंबन यात्रेचा आज शुभारंभ

लातूर - जिल्हा पाणीदार करण्यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत दि. २५ मे ते ५ जून या दरम्यान स्वालंबन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा शुभारंभ शहरी भागासाठी लातूरातील प्रभाग क्र. १ मधून तर ग्रामीण भागासाठी औसा तालुक्यातील जय नगर येथून करण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे राबविण्यात येणार्‍या पंचनिष्ठासाठी ज्या जलयोद्ध्यांची नोंदणी झालेली आहे. त्यांचे प्रशिक्षण उत्साहात पार पडले आहे.
दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या लातूर जिल्ह्याला पाणीदार करून पाण्यासाठी स्वावलंबी असणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करण्यासाठी इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणार्‍या या अभियानाअंतर्गत दि. २५ जून ते ५ मे या दरम्यान स्वावलंबन यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रे दरम्यान शहरी व ग्रामीण भागात अभियानात राबविण्यात येणार्‍या पंचनिष्ठासाठी श्रमदान करण्यात येणार आहे. या पंचनिष्ठा म्हणजे छतावर पडणार्‍या पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण, विहीरी व बोअरचे पुनर्भरण, घर तेथे शोषखड्डा व घर तेथे झाड या आहेत. या पंचनिष्ठांसाठी पालकमंत्री निलंगेकर स्वतः शहरी व ग्रामीण भागात स्वावलंबन यात्रे दरम्यान श्रमदान करणार आहेत.
या स्वावलंबन यात्रेचा शुभारंभ आज दि. २५ मे रोजी सकाळी ७ वाजता शहरी भागासाठी लातुरातील प्रभाग क्र. १ मधून तर ग्रामीण भागासाठी सकाळी ११ वाजता औसा तालुक्यातील जय नगर येथे करण्यात येणार आहे. लातुरातील प्रभाग क्र. १ अंतर्गत येणार्‍या ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर रत्नेश्‍वर देवस्थानात नारळ फोडून या मंदिराच्या छतावरील पाण्याचे पुनर्भरण करून करण्यात येणार आहे. यानंतर प्रभागातील पटेल चौक येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर औसा तालुक्यातील जय नगर येथे घर तेथे शोषखड्डयासाठी श्रमदान करण्यात येणार असून यानंतर औसा शहरातील ३ ठिकाणी पंचनिष्ठांसाठी श्रमदान करण्यात येणार आहे.
इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान लोकसहभागातून यशस्वी करण्यात येणार असून त्या करीता जिल्हाभरात जलयोद्धध्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे. नोंदणी झालेल्या जलयोद्ध्यांसह शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेेतील विद्यार्थी व मनपा कर्मचार्‍यांना गुरुवारी दि. २४ मे रोजी प्रशिक्षण देण्यात आले. अमोल गोवंडे व मनोज सुर्यवंशी यांनी हे प्रशिक्षण दिलेले असून हा प्रशिक्षण वर्ग अतिशय उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणा दरम्यान पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जलयोद्ध्यांशी संवाद साधून हे अभियान जिल्ह्यासाठी किती महत्वाचे आहे याबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षणा वेळी आमदार विनायक पाटील, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार गोंविंद केंद्रे, माजी आमदार बबू्रवान खंदाडे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, जि.प. अध्यक्ष मिलिंद लातूरे, महापौर सुरेश पवार, उपमहापौर देविदास काळे, मनपा सभागृह नेते ऍड. शैलेश गोजमगुंडे यांची उपस्थिती होती.


Comments

Top