HOME   लातूर न्यूज

रेल्वेचे शेखर गोखले यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

प्रमाणपत्र व रोख दोन हजार रूपयांनी सन्मानित


रेल्वेचे शेखर गोखले यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार

लातूर : मध्य रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वेचे येथील आरक्षण पर्यवेक्षक शेखर गोखले यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहिर झाला आहे. मुंबईत येथे झालेल्या एका कार्यक्रमात मध्य रेल्वेचे प्रधान वाणिज्य प्रबंधक शैलेंद्र कुमार यांच्या हस्ते या पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रमाणपत्र व रोख दोन हजार रूपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मध्य रेल्वेच्या वतीने दरवर्षी विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील लातूर आरक्षण केंद्रावरील पर्यवेक्षक गोखले यांची निवड झाली आहे. गोखले यांनी प्रवाशांना दिलेल्या उत्कृष्ट सेवेचे दखल घेऊन रेल्वेने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. निवडीबद्दल त्यांचे विभागीय प्रबंधक एच. के. मल्होत्रा, वाणिज्य मंडळ प्रबंधक राजेंद्रकुमार शर्मा, सहायक वाणिज्य प्रबंधक अजयकुमार शाक्य, सहायक वाणिज्य निरीक्षक लक्ष्मीपुत्र अतनूरे, रेल्वेस्थानक सल्लागार समितीचे सदस्य संजय जाधव, केयूर कामदार, शामसुंदर मानधना, विजय धन्ना व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.


Comments

Top