LaturNews

वृक्ष लागवडीत शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा- शिवराज पाटील

2017-01-09 17:17:03 848 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): वृक्ष लागवड आणि संगोपन काळाची गरज बनली असून या उपक्रमात शेतकरी बांधवांचा सहभाग महत्वाचा आहे. शेतकरी बांधवाना उत्पादन देणारी वृक्ष लागवड करण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानने पुढाकार घ्यावा असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले. ०८ जानेवारी रोजी वसुंधरा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी चाकूरकर यांची निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी चाकूरकर यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला. शिवराज पाटील चाकूरकर यांना प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी ते म्हणाले, अलिकडे पर्यावरणाच्या बाबतीत मानवाकडून हलगर्जिपणा झाला आहे. आता पर्यावरण संवर्धनाकड़े लक्ष देण्याची गरज आहे. वृक्ष लागवड कार्यात शेतकरी बांधवानी पुढाकार घेतल्यास आणखी जोमाने कार्य होईल. शेतकरी बांधवानी चिंच, आंबा, चिकू, डाळिंब अशा प्रकारची फळझाडे लागवड केल्यास आर्थिक उत्पादन मिळून निसर्ग संवर्धन देखील होईल. चाकूरकर यांच्या शेतात चिंचेची झाडे लावावीत असे आवाहन त्यांनी वसुंधरा प्रतिष्ठानला केले. यावेळी वसुंधरा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख विशाल शिंदे, मार्गदर्शक उमाकांत क्षीरसागर, नागनाथ भंडारकोटे, लातूर शहर सहसचिव अनिल सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.





Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी