HOME   लातूर न्यूज

जिल्हयातील प्रत्येक गावात शेतकरी मदत केंद्र

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आदेश

जिल्हयातील प्रत्येक गावात शेतकरी मदत केंद्र

लातूर: जिल्हयातील एकही शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेपासून वंचीत राहू नये. संबंधित विभागाने प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शेतकरी मदत केंद्राची स्थापना करुन शेतकऱ्यांच्या आधार कार्डाची लिंक आहे किंवा नाही याची यादी तात्काळ देण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. औरंगाबाद येथे आयोजित मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडयातील जिल्हयाच्या विविध समस्या बाबत आढावा पूर्व बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयात ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, राज्यात नुकतीच शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेची घोषणा झालेली आहे. या योजनेत जिल्हयातील एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची संबंधित विभागाने दक्षता घ्यावी असे सांगून या योजनेच्या माहिती साठी प्रत्येक गावातील ग्रामपंचायतच्या ठिकाणी शेतकरी मदत केंद्र उभारुन शेतकऱ्यांना या योजनेची संपूर्ण माहिती तसेच शेती विषयक सर्व योजनाची माहिती शेतकऱ्यांना मिळण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच औरंगाबाद येथील आयोजित बैठकीस सर्व विभाग प्रमुखाने अपल्या विभागाच्या सादरीकरणातील माहितीचे संकलन सुक्ष्मपणे करावे असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सर्व विभागांच्या समस्यांबाबत आढावा घेतला. या बैठकीत सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


Comments

Top