LaturNews

चाकूरकरांनी साधला 'सेवालया'तील मुलांशी मुक्त संवाद

2017-06-18 20:17:14 805 Views 0 Comments

सेवालय एक मंदिरच, दहावी, बारावीतील गुणवंतांचा गौरव
लातूर (आलानेप्र): जगात विविध धर्म आहेत़ त्यांच्या संस्थापकांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा एकच आहे़. मात्र त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा अर्थ सांगणाऱ्यांनी आपापल्या सोयीने त्याचा अर्थ लावला़ यामुळे धर्म मर्यादित झाले आहेत़ सर्व धर्मांची स्थापना ही मुळात मानव कल्याणाच्या हेतूतून आणि सत्याच्या रक्षणासाठी झाली आहे़. मात्र हे धर्म मंदिर आणि मस्जिदींमध्ये अडकून पडले आहेत़. मानवतेचा मूळ उद्देश मागे पडत चालला आहे़. त्यामुळे मानवतेचे दर्शन घडविणारे 'सेवालय' हे एक मंदिरच आहे आणि हे मंदिर अधिक श्रेष्ठ आहे़. अशा मंदिरांची निर्मिती सर्वत्र व्हायला हवी, असे प्रतिपादन माजी राज्यपाल व माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले़
एचआयव्ही संसर्गित लहान मुलांचे संगोपन करणाऱ्या हासेगाव येथील सेवालयाला माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भेट दिली़ या भेटीदरम्यान चाकूरकर यांनी मुलांशी मुक्त संवाद साधला़. यावेळी एचआयव्हीसारख्या आजारावर मात करत दहावी आणि बारावीच्या सेवालयातील गुणवंत विद्याथ्र्यांचा चाकूरकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़. या कार्यक्रमास लाईफ केअरच्या संचालिका डॉ़ अर्चनाताई पाटील चाकूरकर, ज्येष्ठ पत्रकार अतुल देऊळगावकर, ऋषिता पाटील, स्वयंप्रभा पाटील, सेवालयाचे संस्थापक रवी बापटले, डॉ़ पवन चांडक, संग्रामप्पा मुक्ता, मनोज मोटे, शांतेश्वर मुक्ता, मारोती मगर, बालाजी गावडे, प्रणिल नागुरे, लिंबराज थोरमोटे, प्रा़ छगनराव शिंदे, मंदोदरी शिंदे, सत्यनारायण चांडक, सौ़ चांडक, डॉ़ गोमारे, उमाकांत बापटणे, घाळप्पा गळगे, उपस्थित होते.
सेवालयातील मुलीने 'आता पुन्हा सेवालयात कधी येणार?' असे विचारले असता, सुरुवातीला इथे येण्यास उत्सुक नव्हतो. मात्र इथे सगळे पाहिल्यानंतर आता पुन्हा पुन्हा इथे येईन असे ते म्हणाले़. समाजातील प्रत्येकाने सेवालयाच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले़. यावेळी सेवालयातील काही विद्याथ्र्यांनी मनोगत व्यक्त केले़ चाकूरकर यांची नात आणि अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची कन्या ऋषिता पाटील हिला बारावीत ९३ टक्के गुण मिळाल्याबद्दल तिचाही यावेळी सत्कार करण्यात आला़.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी