LaturNews

हॅंडमेड आकाश कंदिलांना मागणी, चिनींवर बहिष्कार

2017-10-10 22:34:15 839 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): चिनी-हिंदी भाई भाई म्हणत पाठीत खंजीर खुपसणार्‍या चीनचे मनसुबे जगाला कळाले आहेत. मधल्या काळात चिनी वस्तूंना भारतात मोठे मार्केट होते. सव्स्त आणि सुण्दर दिसणार्‍या या वस्तू कधी चीनसारख्याच कधी बिघडून बसयच्या हे सांगता येत नसे. आता तर चीन युध्दाची भाषा बोलू लागले आहे. डोकलाममधील भानगडी बाहेर आल्या आहेत. परिणामी भारतात चिनी वस्तू नाकारणे सुरु झाले आहे. याचा प्रत्यय आज बाजारात आला. चिनी आकाश कंदेल, पणत्या आणि इतर चिनी वस्तू नागरिक घेत नाहीत, दुकानदारही ठेवत नाहीत. आज आम्ही आकाश कंदील आणि पणत्यांच्या व्यवसायाचा मागोवा घेतला. सगळीकडे हस्तनिर्मित आकाश कंदील आणि पणत्यांची विक्री दिसून आली. या शिआय चिनी फटाकेही बाजारातून आउट झाले आहेत. उत्तम दर्जाच्या देशी आकाश कंदिलांची किंमत ५० ते १४०० सुर्पयांपर्यंत आहे. तर स्थानीक बनावटीचे कंदील ६० पासून ४०० रुपयांपर्यंत मिळतात.
बाजारात स्थानिक बनावटीच्या २० ते २५ प्रकारच्या पणत्या मिळतात. १५ रुपयांपासून १०० रुपये डझनाने पणत्या मिळतात.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी