HOME   लातूर न्यूज

कुत्रा पाळायचाय? मनपाची परवानगी घ्या

पण भटक्या कुत्र्यांचं काय करणार? उत्तर नाही

कुत्रा पाळायचाय? मनपाची परवानगी घ्या

लातूर: लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे पाळीव श्वान आहेत त्यांनी नोंदणी करुन घ्यायची आहे. वार्षिक नोंदणी पन्नास रुपये भरावी लागणार आहे. यासाठी मनपाने मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 प्रकरण परिशिष्‍ट 14 नियम 22 (अ) सहकलम 386 चा हवाला दिला आहे. त्यामुळे महानगरपालिका हद्दीमध्‍ये श्‍वान पाळण्‍यासाठी महानगरपालिकेचा श्‍वान परवाना घेणे बंधनकारक आहे. श्‍वानधारकांनी आपल्‍या पाळीव श्‍वानाचा परवाना काढण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज आरोग्‍य विभाग, महानगरपालिका, लातूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्‍याकडे ३० दिवसांच्‍या आत दाखल करुन आपला परवाना प्राप्‍त करुन घ्‍यायचा आहे. परवान्‍यासाठी लागणारी आवश्‍यक कागदपत्रात विहित नमुन्‍यातील अर्ज,
श्‍वानाचे पासपोर्ट साईज आकारातले ०२ फोटो, नोंदणीकृत पशुवैद्यकाचा अॅंन्‍टी रेबीज व इतर लसीकरण केल्‍याबाबतचा आरोग्‍य दाखला प्रमाणपत्र, परवाना फीस - वार्षीक नोंदणीसाठी ५० व नुतनीकरणासाठी २५ रुपये भरावे लागतील. ३० दिवसांच्‍या आत नोंदणी न केल्‍यास विहीत विलंब आकारण्‍यात येईल. सर्व पाळीव श्‍वानधारकांनी आपल्‍या श्‍वानांची आरोग्‍य (पशुवैद्यकीय) विभाग, मनपा कार्यालय, लातूर येथे नोंदणी करावी असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.


Comments

Top