HOME   लातूर न्यूज

माहेश्वरी समाजाचे फेब्रुवारीमध्ये अधिवेशन

गृह उद्योगास चालना व रोजगार निर्मितीसाठी अधिवेशनात निश्चित धोरण

माहेश्वरी समाजाचे फेब्रुवारीमध्ये अधिवेशन

लातूर: जिल्हा माहेश्वरी समाजाचे जिल्हास्तरीय अधिवेशन १७ फेब्रुवारी २०१९ रोजी औसा येथील श्री केशव बालाजी देवस्थानच्या धर्म व संस्कार नगरीत आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी दिली.
या अधिवेशनाच्या नियोजनासंदर्भात लाहोटी कम्पाऊंड येथील जिल्हा माहेश्वरी सभेच्या कृष्णकुमार लाहोटी सभागृहात राजकुमार पल्लोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत अधिवेशनाचे संयोजकपदी उद्योजक हुकूमचंद कलंत्री यांची निवड करण्यात आली. सहसंयोजक म्हणून विजय चांडक (मुरूड), महेश भुतडा (अहमदपूर) व ईश्वर बाहेती (उदगीर) यांची निवड करण्यात आली.
या अधिवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ नेते व वक्त्यांना आमंत्रीत करण्यात येणार आहे. गृह उद्योगास चालना देण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी अधिवेशनात निश्चित असे धोरण ठरविण्यात येणार आहे. तसेच समाजातील मुली-मुलांचे विवाह जुळविण्यासाठी परिचय पत्राचे (बायोडाटा) संकलन करण्यात येणार आहे. या अधिवेशनास 5 हजार समाज बांधवांची उपस्थिती अपेक्षीत असल्याचे राजकुमार पल्लोड यांनी सांगितले.
या बैठकीस उद्योजक हुकूमचंद कलंत्री, माहेश्वरीच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य बालकिशन मुंदडा, माहेश्वरी सभेचे कोषाध्यक्ष फुलचंद काबरा, उपाध्यक्ष गोविंद कोठारी, महिला जिल्हा संघटक विभा गिल्डा, ललिता राठी, गणेश हेड्डा, राजेश मंत्री, ईश्वर डागा, विशाल काबरा, नंदकिशोर सोनी, हरिकिशन मालू, विजय चांडक, भगवानदास लड्डा, गोकुळ चांडक, योगेश तापडीया, गोविंद लोया, सत्यनारायण सोनी, प्रल्हाद चांडक, पांडुरंग कचोळ्या, मधुसूदन सोनी, दीपक बजाज, दिलीप सोमाणी, गगन मालपाणी, श्रीनिवास नोगजा, महेश बिदादा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top