HOME   महत्वाच्या घडामोडी

नाणारची जमीन गुजराती-मारवाडींकडे कशी? बलात्काराला जास्तच प्रसिद्धी, सिन्हांनी सोडला भाजपा, हायटेक पोलिस......२२ एप्रिल २०१८

ठाकरेंच्या सभेवर बहिष्कार, फाशीचा नवा कायदा, घोटाळेबाजांना देशांतर बंदी, जमल्या खोट्या नोटा, खेळाडूंना ०२ टक्के आरक्षण, एककेंद्री सरकार, कॉपीसाठी आत्महत्या, एटीएमचा हिशोब

नाणारची जमीन गुजराती-मारवाडींकडे कशी? बलात्काराला जास्तच प्रसिद्धी, सिन्हांनी सोडला भाजपा, हायटेक पोलिस......२२ एप्रिल २०१८

* उद्धव ठकरे यांच्या नाणारच्या सभेवर ग्रामस्थांचा बहिष्कार
* उद्योग खाते शिवसेनेकडे तो आधी रद्द करा, मगच नाणारमध्ये या, ग्रामस्थांनी बजावले
* नाणार प्रकल्पाची जमीन आधीच गुजराती, मारवाडी परप्रांतीय लोकांना मिळतेच कशी?- राज ठाकरे
* सरकारकडूनच माहिती फुटल्यामुळे परप्रांतातील लोकांनी या जागा घेतल्याचा राज ठाकरे यांचा आरोप
* १२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणार्‍यांना फाशीची शिक्षा, लवकरच नवा कायदा
* बलात्कार टाळता येत नाहीत, एक दोन घटनांचे भांडवल करणे योग्य नाही, केंद्रीय मंत्री गंगवाल
* शरद पवार आणि राहूल गांधी यांच्यात तासभर बैठक, दोन्ही पक्ष जवळ आल्याची चर्चा
* १०० कोटींपेक्षा अधिक घोटाळा करणार्‍यांना आता देशाबाहेर जाता येणार नाही, नवा कायदा
* यशवंत सिन्हा यांचा भाजपाला रामराम, आता राजकरण करणार नाही, अराजकीय व्यासपीठ स्थापन करणार
* नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर खोट्या नोटा जमल्या
* नरेंद्र मोदी भारताचे नव्हे गुजरातचे मुख्यमंत्री- राज ठाकरे
* खासदारांना पगारवाढ हवी कशाला, आजवर आपण घेतली नाही- वरुण गांधी
* कर्जबुडवेगिरी करणार्‍या १५० जणांची यादी पंजाब बॅंकेनं केली जाहीर, पासपोर्टही केले जप्त
* पीएनबी घोटाळा: नीरव मोदी विरोधात पंजाब नॅशनल बँक हाँगकाँगच्या हायकोर्टात
* पोलिसांना हायटेक करण्यासाठी नवे अ‍ॅप तयार
* अहमदनगर येथे रागाच्या भरात एका तरुणाच्या डोक्यात घुसवली चावी, शस्त्रक्रिया करुन काढली बाहेर
* तेलंगणात सरकारी नोकरीत खेळाडूंना ०२ टक्के आरक्षण
* औरंगाबाद येथे दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टय़ातील ऑरीक बिडकीनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले भूमिपूजन
* देशात नागरी उड्डाण विभागाला नवीन एक हजार विमानांची गरज, निर्मितीतून दीड लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध
* नागरी उड्डाण विभागामार्फत ठरविणार ‘कार्गो’ धोरण, ड्रोन कॅमेरा निर्मिती कारखानेही उभारणार- उद्योग व नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू
* पुर्वीचे सरकार हे आंदोलकांची मते ऐकून घेत, मात्र सध्या देशात एककेंद्री राजकारण- मेधा पाटकर
* विकासाची संकल्पाना विकृतीकडे झुकताना दिसत असल्याची मेधा पाटकर यांची पत्रकार परिषदेत टीका
* राज्यात सॅनिटरी नॅपकीनची विल्हेवाट योग्यप्रकारे लावण्याबाबत उदासीनता- डॉ. इंद्रजीत खांडेकर यांचा अहवाल
* कोणतीही राजकीय विचारसरणी परिपूर्ण नसते, लेखक कलावंतांनी राजकीय पक्षांशी स्वत:ला जखडून घेऊ नये- कवी गुलज़ार
* लेखकाची बांधिलकी ही कायम अस्सल अनुभूती असलेल्या लोकांशीच असायला हवी- गुलज़ार
* बलात्कारासारख्या घटनांमध्ये राजकारण नको, त्यांना जाती-धर्माचेही संबंध जोडू नयेत- अण्णा हजारे
* हिट अॅण्ड रन प्रकरण: सलमानविरोधातील जामीनपात्र वॉरंट न्यायालयाने केले रद्द
* अबू सालेमला लग्नासाठी मागितलेला पॅरोल फेटाळला
* कर्जत तालुक्यातील राखीव वनक्षेत्र आगीत भस्मसात
* वृत्तपत्र छाया चित्रकार फिरोझ खान यांना बिडकीन येथे मारहाण
* औरंगाबाद येथे बीएड परीक्षेत कॉपी करू देण्यासाठी विद्यार्थ्याने दिली आत्महत्येची धमकी, कॉलेजची पोलिसात तक्रार
* पुणे येथे झोपडपट्टीतील आग विझवताना अग्निशमन दलाचा जवान धुराने कोंडल्याने रुग्णालयात दाखल
* कठुआ आणि उन्नाव बलात्काराच्या घटनेबद्दल जगभरातील ६०० हून अधिक विचारवंत, अभ्यासकांच्या सहीचे पंतप्रधानांना पत्र
* भारतातील परिस्थिती भयानक, नरेंद्र मोदी यांनी त्यावर दीर्घकाळ मौन पाळल्याबद्दल पत्रातून व्यक्त केली नाराजी
* सुरत बलात्कार प्रकरण: पीडित मुलगी व तिच्या आईला मजुरीसाठी ३५ हजारला खरेदी केल्याचे आरोपीने सांगितले चौकशीत
* इंदूरमधील शिव विलास पॅलेसच्या तळघरात ०४ महिन्यांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
* एटीएम केंद्रातून कोणी, किती रोकड काढली, कोणत्या कारणासाठी याची चौकशी करण्याचा सरकारचा निर्णय
* आर्थिक गुन्हे करून देशातून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांची संपत्ती होणार जप्त- अध्यादेशास मंजुरी
* मुलींवरील बलात्काराच्या वाढत्या घटना ही चिंतेची बाब, अशा घटनांना जरा जास्तच प्रसिद्धी दिली जात आहे- खा. हेमा मालिनी
* अशाप्रकारच्या घटना आधीही घडत असतील मात्र त्या इतक्या प्रकाशझोतात आल्या नाहीत- खा. हेमा मालिनी
* छत्तीसगडमधील सुकमामध्ये नक्षलवाद्यांच्या गोळीबारात अमेठीतील सीआरपीएफ जवान शहीद
* परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सहा दिवसांच्या चीन आणि मंगोलिया दौऱ्यावर
* सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील वाढत्या कर्जांमुळे जगावर पुन्हा येणार आर्थिक मंदीचं संकट- आंतरराष्ट्रीय नाणे निधी
* जगातील ७० कोटी कामगार आजही दारिद्र्यात, कामगारांचे दैनंदिन उत्पन्न निकषापेक्षा कमी- आंतरराष्ट्रीय कामगार संघटना


Comments

Top