HOME   महत्वाच्या घडामोडी

न्यायमुर्तींनी काढली सरकारची शरम, अमित ठाकरे मनसेचे नेते, मुसलमानांना हाकलण्यासाठी मनसेचा मोर्चा, शेतकर्‍यांना थेट मतदान नाही.....२३ जानेवारी २०२०

न्यायमुर्तींनी काढली सरकारची शरम, अमित ठाकरे मनसेचे नेते, मुसलमानांना हाकलण्यासाठी मनसेचा मोर्चा, शेतकर्‍यांना थेट मतदान नाही.....२३ जानेवारी २०२०

* आज लातुरच्या बाजारात: सोयाबीन ४२८८, तूर ५३५१ तर हरभरा पोचला ३९३० रुपयांवर
* शिवसेनेच्या वचनपूर्ती मेळव्याला सुरुवात
* देवेंद्र फडणवीसांच्या काळात विरोधकांचे फोन टॅप केले गेले- दिग्विजय सिंग
* सोमवारी मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांचे औरंगाबादेत उपोषण, देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवेही सहभागी होणार
* मनसेच्या झेंड्यावर राजमुद्रा, संभाजी ब्रिगेडने केली पोलिसात तक्रार
* अमित ठाकरे यांची मनसेच्या नेतेपदी निवड
* पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या मुसलमांनाना भारतातून हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी मनसे मोर्चा काढणार
* मनसेनं झेंडा बदलण्याऐवजी मन बदलावे- रामदास आठवले
* मला खालपासून काम करत वर यायचंय- अमित ठाकरे
* नवे कायदे करताना सरकारला शरम कशी वाटली नाही? निवृत्त न्यायमूर्ती आर वाय शेख टाऊन हॉलच्या आंदोलनात
* कायदे जनतेसाठी असतात इंग्लंडमध्ये जनतेचा विचार घेऊन केले जातात- निवृत्त न्यायमूती आर वाय शेख
* लातुरच्या नियिजित नाट्यगृहातील दालनांना वाजपेयी, ठाकरे, मुंडे यांची नावे- उप महापौर
* लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापतीपदी ज्योती राठोड यांची निवड
* लातूर मनपाच्या स्थायी समितीत चर्चा न करताच सव्वा दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी
* सीएए कायद्याला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
* कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकर्‍यांना थेट मतदान करता येणार नाही
* मुंबई २४ तास चालू ठेवण्याच्या पर्यटन विभागाच्या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मंजुरी


Comments

Top