HOME   फोटो फिचर

लातुरात घातक गतिरोधक

लातुरात घातक गतिरोधक

लातूर शहरातील चांगल्या असलेल्या आणि नव्याने चांगल्या झालेल्या रस्त्यांवर गतिरोधक बसवण्याचे काम चालू आहे. हे गतिरोधक सर्वांसाठीच घातक आहेत. न्यायालयाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे त्याची बांधणी करण्यात आलेली नाही. संपूर्ण लांबीचे पण रुंदीने छोट्या असलेल्या या गतिरोधकांवरुन जाताना वाहनांचे नुकसान तर होतेच. शिवाय चालकांना विशेषत: दुचाकीचालकांना यांचा मोठा त्रास होतो. पाठीचे आजार संभवतात. या तुलनेत औसा मार्गाव पॉलिटेक्निकच्या समोर दोन गतिरोधक आहेत. ते मात्र व्यवस्थित आहेत. या गतिरोधकावरुन जाताना वाहनांची गती कमी तर होतेच होते. शिवाय वाहनांना आणि चालकांना त्रास होत नाही.

Comments

Top