लातुरच्या नाट्यगृहाला जुन्या ठरावाप्रमाणे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचेच नाव द्यावे यासाठी भाजप आक्रमक झाली आहे. आंदोलने झाली, आणखी तीव्र होणार आहेत म्हणे. तर नव्या ठरावाप्रमाणे नटश्रेष्ठ श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव द्यावे यासाठी कॉंग्रेस आक्रमक आहे. दरम्यान भाजपाचे नगरसेवक सगळी कागदपत्रे घेऊन लातुरच्या एका सर्वात बड्या अधिकार्यांना भेटले. आधी नाट्यगृह तर बांधून होऊ द्या. बाळ जन्मायच्या आधी नावासाठी का भांडता? असं विचारुन या नगरसेवकांची बोळवण केली!
नाट्यगृहाचे बांधकाम १२ कोटींचे आहे. वर्षभरात पूर्ण करायचे आहे. बांधकाम वेगात सुरु आहे. साहित्यही दर्जेदार वापरले जात असल्याचे दिसून आले.
Comments