टॉप स्टोरी

भाजपाकडून कॉंग्रेसचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न, पुरावे उघड करु- कॉंग्रेस

लातूर (आलानेप्र): लातूरात निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेवकांना फोडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे, यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवली जात आहेत असा आरोप आज कॉंग्रेसकडून करण्यात आला. शहर कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोईज शेख आणि महापौर दीपक सूळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली.
महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचे ३६ तर कॉंग्रेसचे ३३ नगरसेवक निवडून आले. भाजपाला काठावरचे बहुमत मिळाले म्हणूनच हा खटाटोप केला जात आहे असं यावेळी सांगण्यात आलं. कॉंग्रेसने विरोधी पक्षाची भूमिका बजावत लातुरकरांच्या हिताच्या प्रश्नावर सहकार्य करण्याची भूमिका घेतली. असे असतानाही कॉंग्रेस भाजपाचे नगरसेवक पळवणार अशी अफवा पसरवली गेली. हेच लोक आता कॉंग्रेसचे नगरसेवक फोडण्याच्या उद्योगाला लागले आहेत. भाजपात या, राजीनामा द्या, आम्ही Read More »

व्हिडिओ न्यूज

लातूर न्यूज

विक्रांत गोजमगुंडे लागले कामाला, नाल्याची कामे सुरु

लातूर (आलानेप्र): लातूर महानगरपालिकेत नवे पदाधिकारी रुजू होण्यापूर्वी-सत्ता स्थापन होण्यापूर्वीच नगरसेवक, स्थायी समितीचे सभापती विक्रांत गोजमगुंडे कामाला लागले आहेत. प्रभाग Read More »


महत्वाच्या घडामोडी

व्हीआयपी कशाला? सगळेच नागरिक महत्वाचे: मन की बात!

नवी दिल्ली: भारतात व्हीआयपी संस्कृतीचा द्वेष केला जातो, हा द्वेष खोलवर गेल्याचा अनुभव मला आला आहे. या देशातील प्रत्येकजण व्हीआयपी Read More »